अभिनेत्री प्रियांका चोप्राने फक्त बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्ये देखील एक वेगळी ओळख निर्माण केलीयं. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्रियांकाने अनेक मोठे खुलासे देखील केले आहेत. एक यशस्वी अभिनेत्री असूनही तिने अपयशाबाबत असे काही सांगितले की, कोणाचाही विश्वास त्यावर बसणार नाही. इतरांप्रमाणेच प्रियांकाचाही एक मायनस पॉइंट आहे, ज्यावर ती उघडपणे बोलली आहे. प्रियांका चोप्राने या मुलाखतीमध्ये नेमके कोणत्या कोणत्या विषयावर भाष्य केले हे आपण जाणून घेऊयात.
नुकताच प्रियांकाने एका मुलाखतीत महत्वाच्या विषयांवर भाष्य केले. प्रियांका म्हणाली की, मी सध्या एका आईच्या भूमिकेमध्ये आहे आणि मला खूप आनंदा होतोयं. अपयशावर बोलताना प्रियांका म्हणाली की, आता मी आयुष्याकडे आणि अपयशाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहते. माझ्या आयुष्यातही अनेक अपयश आले. माझ्याकडे बर्याच गोष्टी आहेत ज्याबद्दल मी बोलत नाही. नक्कीच मी खंबीर आहे पण अपयश आल्यावर मला रडू येते…
प्रियांका पुढे म्हणाली की, मी अपयशावर थांबणारी व्यक्ती अजिबातच नाहीयं. कारण, अपयश हा जीवनाचा एक भाग आहे ज्यापासून आपण पळून जाऊ शकत नाही. तो प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. मी आज 40 वर्षांची झाले, पण जेव्हा मी माझ्या अपयशाचा विचार करते, तेव्हा मला खूप जास्त त्रास होतो. प्रियांकाजवळ आता हॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंत अनेक चित्रपट हातात आहेत. ती लवकरच रिचर्ड मॅडनसोबत ‘सिटाडेल’ या स्पाय थ्रिलर वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.