गेली काही दिवसापूर्वीच केंद्रातील भाजपा सरकारने आणलेल्या ‘अग्निपथ’ योजनेला काँग्रेसने विरोध केला होता,तेव्हा आम्ही संपूर्ण देशाला सांगितले होते की,या सरकारचा हेतू स्पष्ट नाही, ते तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करत आहेत.
आता देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय देखील अग्निवीरांच्या धर्तीवर कर्मचाऱ्यांना बँकेत ठेवणार असून, कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना एसबीआयच्या कायम स्वरुपी कर्मचाऱ्यांना मिळणारे सर्व फायदे मिळणार नाहीत.
ही सुरुवात आहे. नोकऱ्यांचे हे ‘कॉन्ट्रॅक्ट मॉडेल’ इतर बँका आणि संस्थांमध्येही हळूहळू लागू केले जाईल.
बँकेत एकदा सरकारी नोकरी लागली की आयुष्यभर आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल, कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येईल, या विचाराने लाखो तरुण बँकेच्या परीक्षेच्या तयारीसाठी रात्रंदिवस अभ्यास करतात. पण केंद्रातील भाजप सरकारला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि मजबूत भारताची कल्पना कधीच आवडली नाही ?
पालकांनी किती धडपड केली, स्वत: त्याग करून मुलांना शिक्षण दिले, महागड्या शिक्षणाचा भार उचलून आपली मुले अधिकारी व्हावीत यासाठी अहोरात्र कष्ट केले.पण आजचे हे सरकार पालकांसह तरुणांच्या स्वप्नांचाही चक्काचूर करत आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार सांगताय की हे सर्व ‘मित्रांच्या’ फायद्यासाठी केले जात आहे, हे सरकार संपूर्ण देशाला खासगीकरणाकडे ढकलत आहे.
त्यामुळे काँग्रेस पक्ष तुमच्या हक्कांसाठी सदैव लढेन, अजूनही वेळ आहे, डोळे उघडा आणि तुमच्याविरुद्धच्या या षडयंत्रांविरुद्ध आवाज उठवा असे शिवानी वडेट्टीवार यांनी सांगितले