नवी दिल्ली : कधी लघूशंका तर कधी मारहाण तर कधी दारू पिऊन धिंगाणे असे प्रकार विमानात घडले असताना आता आणखी एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. वारंवार DGCA नं नियम कठोर करूनही आता विमानाच्या पायलटकडून या नियमाला कचऱ्याची टोपली दाखवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Air India च्या पायलटने आपल्या खास मैत्रिणीला सूट दिली आणि त्यांनी अक्षरश: कॉकपिटचं लिव्हिंग रूम केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी पायलटविरोधात आता चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्याच्यावर आरोप आहे की त्याने मैत्रिणीला कॉकपिटमध्ये नेलं. याशिवाय बिजनेस क्लासमधील जेवणही दिलं. तिला नियम मोडून स्पेशल ट्रिटमेंट दिली.
एअर इंडियाच्या पायलटला आपल्या मैत्रिणीला कॉकपिटमध्ये फिरायला घेऊन जाणं चांगलंच महागात पडलं. ही घटना 27 फेब्रुवारी रोजी दुबईहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात घडल्याची माहिती मिळाली आहे. एअर इंडियाच्या पायलटवर आपल्या महिला मैत्रिणीला कॉकपिटमध्ये फिरायला नेल्याप्रकरणी डीजीसीएमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फक्त एका प्रवाशाला घेऊन विमानाने केलं उड्डाण; राजाप्रमाणे केलं वेलकम, विचित्र कारण समोर
A pilot of an Air India flight, operating from Dubai to Delhi, entertained a female friend in the cockpit, on February 27, violating DGCA safety norms. Probe being conducted: DGCA
— ANI (@ANI) April 21, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.