नवी दिल्ली : वर्ल्ड बँकच्या अध्यक्षपदासाठी नुकत्याच निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीआधी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अजय बंगा यांच्या नावाची शिफारस केली होती. वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षपदावरही भारतीय वंशाच्या अजय बंगा यांची निवड झाली आहे.
भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक अजय बंगा यांची जागतिक बँकेच्या पुढील अध्यक्षपदी निवड झाली. बुधवारी वर्ल्ड बँकेनं याबाबत महत्त्वाची माहिती दिली. जागतिक बँकेनेकडून मिळालेल्या माहितीनुसार संस्थेच्या कार्यकारी संचालकांनी बँकेचे 14 वे अध्यक्ष म्हणून अजय बंगा यांची निवड केली. 2 जून 2023 पासून हा पदभार स्वीकारतील आणि पुढील पाच वर्षे या पदावर कार्यरत असणार आहेत.
डेव्हिडन यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिला होता. त्यानंतर पुढचा अध्यक्ष कोण याबाबत चर्चा सुरू होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अजय बंगा यांच्या नावाची शिफारस जागतिक बँकेच्या पुढील अध्यक्षपदासाठी केली होती. मास्टरकार्ड या प्रसिद्ध क्रेडिट कंपनीचे सीईओ राहिलेले अजय बंगा हे इंडो-अमेरिकन आहेत.
The Executive Directors of the @WorldBank today selected Ajay Banga as the President of the World Bank. Mr. Banga begins his five-year term on June 2, 2023.
Read the news release: https://t.co/xeSDLCwGUn pic.twitter.com/2Q2MVT0VBH
— World Bank (@WorldBank) May 3, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.