मुंबई, 18 एप्रिल : ‘मी काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का अशी वेळ आली आहे. हे बरोबर नाही. सकाळपासून माझा सरकारी बंगला आहे. त्याच्या मागे कॅमेरे लावले आहे, अरे काय चाललंय, मला बोलायचं असेल तर इथं बोलेन, राष्ट्रवादीच्या कार्यालयात बोलेन किंवा कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलेन. तुम्हीही सभ्यता बाळगा, असं म्हणत अजित पवार यांनी पत्रकारांना झापलं.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दल चर्चांना ऊत आला आहे. या सगळ्या गोंधळावर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली आणि सर्व बातम्या या चुकीच्या असल्याचा खुलासा पवारांनी केला.
तुमच्या शहरातून (मुंबई)
‘कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हाल झाले आहे. हरभरा खरेदी केंद्र बंद पडली आहे. बारदाणं नाही म्हणून खरेदी बंद केली हे कारण आहे का? सरकारची ही जबाबदारी आहे, त्याबद्दल कुणी बोलत नाही. पण सकाळपासून माझा सरकारी बंगला आहे. त्याच्या मागे कॅमेरे लावले आहे, अरे काय चाललंय, मला बोलायचं असेल तर इथं बोलेन, राष्ट्रवादीच्या कार्यालयात बोलेन किंवा कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलेन. तुम्हीही सभ्यता बाळगा. सर्वांनी तथ्य सांभाळून बाळगा, असा सल्लाही पवारांनी मीडियाला दिला.
‘मी काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का अशी वेळ आली आहे. हे बरोबर नाही. माझी विनंती आहे, सरकारबद्दल सुप्रीम कोर्टात काय निकाल लागेल तो लागेल. बाळासाहेब थोरात काय बोलले याची बातमी गेली नाही. इतर नेतेही मंडळी बोलली आहे. प्रत्येक पक्षाचे दोन नेते बोलणार आहे. जयंत पाटील आणि अनिल देशमुख बोलतील. मराठवाड्यामध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे बोलणार होते. अजित पवार बोलले नाही, एवढं का प्रेम आलं. माझ्या ट्वीटमध्ये फोटो काढला तर त्याच्याही बातम्या केल्या आहे. मी काय सारखा झेंडा तिथे ठेऊ शकत नाही. काही असेल मी सांगेना. तुम्हाला सांगायची काही ज्योतिष्याची गरज नाही. असं कुठलंही आमच्या मनात नाही, अशी नाराजीही पवारांनी व्यक्त केली.
चर्चा अशी सुरू आहे की, राष्ट्रवादी शिंदे फडणवीस सरकार पाठिंबा देणार अशी चर्चा रंगली आहे, अशी कुणी चर्चा केली, गॉसिप कुणी केलं, मी कुठे काही बोललो, राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्यानं सांगितलं का? राष्ट्रवादीची स्थापना ही स्वाभिमानातून झाली आहे. आम्ही सगळे काम करत आलो आहे, आमच्या जिवात जीव आहे, तोपर्यंत राष्ट्रवादीसाठी काम करत राहणार, असंही अजितदादांनी पत्रकारांना झापलं.
‘केंद्रातील ज्या संस्था आहे, सीबीआय, ईडी आहे त्यांना तपास करण्याचा अधिकार आहे. चौकशी ही अनेक दिवसांपासून सुरू आहे. MCB बँकेची बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. ते प्रश्न देतात आम्ही उत्तरं देतो. काल सुद्धा केजरीवालांची चौकशी झाली, त्यात नवीन नाही, असंही पवार म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.