मुंबई, 18 एप्रिल : मी काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का अशी वेळ आली आहे. हे बरोबर नाही. आता हे पूर्ण थांबवा, याचा पूर्णपणे तुकडा पाडा, यामध्ये कारण नसताना, 40, 50 आमदारांच्या सह्या झाल्या नाही. आम्ही कुठल्या आमदाराची सही घेतली नाही, त्याचे काही कारणही नाही, असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट खुलासा केला आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दल चर्चांना ऊत आला आहे. या सगळ्या गोंधळावर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली आणि सर्व बातम्या या चुकीच्या असल्याचा खुलासा पवारांनी केला.
तुमच्या शहरातून (मुंबई)
माझ्याबद्दल ज्या बातम्या पसरवत आहे, मी सगळ्यांना सांगतो, यात काहीही तथ्य नाही. मी 40 आमदारांच्या सह्या घेतल्या नाही. आम्ही सगळे राष्ट्रवादीतच आहोत, सगळे आमदार हे राष्ट्रवादीतच राहणार आहे. ज्या वृतवाहिन्या आणि राजकीय नेते जे काही बोलत आहे, ते त्यांचं मत आहे, असं पवार म्हणाले.
(अजित पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे भडकल्या, नेमकं काय म्हणाल्या?)
‘मी विधान परिषदेत बसत असतो, आज सगळे आमदार मला भेटायला आले आहे. यात वेगळा अर्थ काढू नका. जे आमदार हे मतदारसंघातील काम घेऊन आले आहे. त्याच्यामुळे आमचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. तो सुद्धा संभ्रम अवस्थेत गेला आहे. काहीही काळजी करू नका, शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली पक्ष स्थापन झाला आहे. ज्या बातम्या पसरवल्या जात आहे, त्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहे. राज्यातील महत्त्वांच्या विषयाचे प्रश्न दुसरीकडे नेण्याचा हा प्रयत्न आहे, अशी नाराजीही पवारांनी केली.
‘कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हाल झाले आहे. हरभरा खरेदी केंद्र बंद पडली आहे. बारदाणं नाही म्हणून खरेदी बंद केली हे कारण आहे का? सरकारची ही जबाबदारी आहे, त्याबद्दल कुणी बोलत नाही. पण सकाळपासून माझा सरकारी बंगला आहे. त्याच्या मागे कॅमेरे लावले आहे, अरे काय चाललंय, मला बोलायचं असेल तर इथं बोलेन, राष्ट्रवादीच्या कार्यालयात बोलेन किंवा कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलेन. तुम्हीही सभ्यता बाळगा. सर्वांनी तथ्य सांभाळून बाळगा, असा सल्लाही पवारांनी मीडियाला दिला.
(मी अध्यक्ष म्हणून सांगतोय, अजितदादांच्या चर्चांवर पहिल्यांदाच शरद पवार बोलले; म्हणाले….)
‘मी काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का अशी वेळ आली आहे. हे बरोबर नाही. माझी विनंती आहे, सरकारबद्दल सुप्रीम कोर्टात काय निकाल लागेल तो लागेल. बाळासाहेब थोरात काय बोलले याची बातमी गेली नाही. इतर नेतेही मंडळी बोलली आहे. प्रत्येक पक्षाचे दोन नेते बोलणार आहे. जयंत पाटील आणि अनिल देशमुख बोलतील. मराठवाड्यामध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे बोलणार होते. अजित पवार बोलले नाही, एवढं का प्रेम आलं. माझ्या ट्वीटमध्ये फोटो काढला तर त्याच्याही बातम्या केल्या आहे. मी काय सारखा झेंडा तिथे ठेऊ शकत नाही. काही असेल मी सांगेना. तुम्हाला सांगायची काही ज्योतिष्याची गरज नाही. असं कुठलंही आमच्या मनात नाही, अशी नाराजीही पवारांनी व्यक्त केली.
संजय राऊत विघ्नसंतोषी, अजितदादांनी फटकारलं
‘आमच्याबद्दल काही विघ्नसंतोषी लोक बातम्या पेरण्याचं काम करत आहे. माझ्या पक्षातील म्हणत नाही. आमच्याबद्दल आकस असणारा कुणी नाही. परंतु, पक्षाबाहेरचे काही प्रवक्ते हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाल्यासारखे बोलत आहे, त्यांना कुणी अधिकार दिला आहे, कुणाच ठाऊक. पक्षाची बैठक होईल तेव्हा मी बोलणार आहे. तुमच्या पक्षाचं काय बोलायचं आहे ते बोलाना, तुम्ही ज्या पक्षाचे मुखपत्र आहे, त्याबद्दल बोला. तुम्ही आम्हाला कोट करून ते असं झालं, तसं झालं, आम्ही आमची भूमिका मांडण्यासाठी ठाम आहोत. आमचं वकिलपत्र घेण्याचं कुणी कारण नाही. त्यांनी त्यांची भूमिका त्यांनी मांडावी, आमची भूमिका मांडण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर आमच्याकडे माणसं आहे आम्ही सक्षम आहोत, असं म्हणत अजित पवारांनी संजय राऊतांना फटकारलं.
उद्धव ठाकरे पण सुद्धा उत्तर देतात, मी एकटा नडेन, मी त्यांना सुद्धा एकत्र विमान प्रवासात होते, त्यावेळी सगळं सांगितलं होतं. आता तर शिंदे गटाचे नेते तर आम्ही त्यांना घेणार असंही बोलत आहे, पण कोण जाणार आहे. आता हे पूर्ण थांबवा, याचा पूर्णपणे तुकडा पाडा, यामध्ये कारण नसताना, 40, 50 आमदारांच्या सह्या झाल्या नाही. आम्ही कुठल्या आमदाराची सही घेतली नाही, त्याचे काही कारणही नाही, अशी विनंतीही पवारांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.