आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असणारा ‘धर्मवीर’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता हा चित्रपट ओटीटीवरुन प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटामधील एक व्हिडीओ शेअर करुन मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी एक शिवसेनेवर आरोप केले आहेत.
या चित्रपटामधील एक डायलॉग काढून हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे, असं अमेय खोपकर यांचे मत आहे. अमेय खोपकर यांनी शेअर केलेल्या ट्वीटमध्ये धर्मवीर चित्रपटातील अखेरच्या सीनचे दोन व्हिडीओ दिसत आहेत. यामधील एका व्हिडीओमध्ये चित्रपटगृहात रिलीज झालेला सीन आहे तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये ओटीटीवर रिलीज झालेला सीन आहे. यामध्ये एका डायलॉग एडिट केला असल्याचा आरोप अमेय खोपकर यांनी केला आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी, ‘‘धर्मवीर’ आनंद दिघे यांचा आवाज दाबणाऱ्या वृत्तीचा कडक शब्दात निषेध’ असं लिहिलं आहे.अमेय खोपकर यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहे. ते म्हणाला, ‘मला कोत्या मनाच्या लोकांची कीव करावीशी वाटते. शिवसेनेची लोक हिंदुत्ववादी असल्याचा आणि हिंदुत्वाची भगवी शाल पांघरल्याचा आव आणतात.
प्रविण तरडेनं हा सिनेमा आभ्यास करुन, मेहनत करुन तयार केला आहे. त्यामध्ये एक डायलॉग आहे की, दिघे साहेबांना जेव्हा राज साहेब भेटायला जातात तेव्हा दिघे साहेब म्हणतात की, आता संपूर्ण हिंदुत्वाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर. चित्रपट रिलीज झाल्यानंतर मातोश्रीमधील लोकांना हे बघवलं नाही. ओटीटीवर हा चित्रपट रिलीज झाल्यावर तो डायलॉग त्या लोकांनी काढायला लावला. हा डायलॉग चित्रपटामधून काढला आहे, हे प्रविण तरडे यांना देखील माहित नाही. कारण मी प्रविण तरडेला फोन केला होता. त्यानं मला सांगितलं की या गोष्टीबद्दल त्याला कोणतीच माहिती नाही. दिग्दर्शकाला न विचारता डायलॉग कसा काढता? हे असे डायलॉग काढून काय उपयोग नाही. मी या गोष्टीचा निषेध करतो. मी हे लोकांसमोर आणलं आहे. लोकांना हा सवाल हा डायलॉग काढायला लावणाऱ्यांना विचारावं.