चंडिगढ, 23 एप्रिल : कट्टर खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगला मोगा जिल्ह्यातून अटक करण्यात आली. गेल्या ३६ दिवसांपासून अमृतपालने पोलिसांना गुंगारा दिला होता. अखेर त्याला अटक केली असून त्याआधी मोगा जिल्ह्यातील रोडे गाव इथं एका गुरुद्वारात प्रवचनही दिलं. अमृतपाल सिंह तरुणांना बंदूक संस्कृतीकडे नेण्यासाठी प्रयत्न करत होता असा आरोप आहे.
मोगा हे खलिस्तानी, फुटिरतावादी जनरल सिंह भिंडरावाले यांचं गाव आहे. अमृतपाल सिंह त्यांचा अनुयायी असल्याचा नेहमीच दावा करत होता आणि त्याचे समर्थक त्याला भिंडरावाले २.० असंही मानतात. मोगा इथं असलेल्या रोडेवाल गुरुद्वारातील ग्रंथीने सांगितलं की, अटकेआधी अमृतपालने आतील लोकांसमोर प्रवचनही दिलं होतं. एएनआयशी बोलताना ज्ञानी जसबिर सिंह यांनी दावा केला की, अमृतपाल रोडेवाल गुरुद्वारात रात्री आला होता. त्याने स्वत:च पोलिसांना ठावठिकाणा सांगितला आणि सकाळी ७ वाजता आत्मसमर्पण करणार असल्याचं सांगितलं.
ज्यांच्यामुळे अतिक आणि अश्रफही होते दहशतीत; UP मध्ये तब्बल 150 एन्काउंटर करणारे IPS आहेत तरी कोण?
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खलिस्तानी समर्थक अमृतपाल एक महिन्यांपासून फरार होता. त्याला अटकेनंतर ढिब्रूगढ सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे. १८ मार्च रोजी पोलिसांना चकवून तो फरार झाला होता. ११ एप्रिलला अमृतपालचा सर्वात जवळचा सहकारी पप्पलप्रीत सिंहला अटक केली होती. याशिवाय अमृतपालच्या सहकाऱ्यांना पंजाबच्या बाहेरील तुरुंगात हलवण्यात येत आहे.
शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना अमृतपाल याच्या अटकेबाबत विचारण्यात आलं होतं. त्यावर ते म्हणाले होते की, कधी कधी असं होतं. आधी तो उघडपणे फिरत होता, पण आता त्याच्या हालचाली करू शकत नाही. १८ एप्रिलला अमृतपाल सिंहच्या दोन सहकाऱ्यांना पंजाब आणि दिल्ली पोलिसांनी संयुक्त मोहिम आखून अटक केली होती. मार्च महिन्यात त्याला फरार घोषित करण्यात आलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.