हैद्राबाद – भारतीय मुस्लिमांचा आणि मुघलांचा काहीही संबंध नाही असं वक्तव्य एमआयएमचे अध्यक्ष असादुद्दिन ओवेसी यांनी केलं आहे. ओवेसी यांनी हा प्रश्न फेसबुकवर विचारला आहे. भारतीय मुसलमान आणि मुघलांचा काहीही संबंध नाही, पण हे सांगा की मुघलांच्या बायका कोण होत्या असा प्रश्न त्यांनी या पोस्टमध्ये विचारला आहे.
याच पोस्टमध्ये ओवेसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका केली आहे. संघामध्ये स्वाभिमान आणि सहानुभूती हे गुण शिकवले जात नाहीत. मदरशांमध्ये ते शिकवले जातात असं ओवेसी यात म्हणतात. या देशाला भारतीय मुसलमानांनी समृद्ध केलंय पुढेही करत राहातील असं ते म्हणतात.
असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या अन्य एका व्हिडीओ ट्वीटमध्ये म्हटलं, आसाममध्ये पुरामुळे ७ लाख लोकांवर परिणाम झालाय, १८ लोकांचे मृत्यू झाले आहेत. मात्र, आसामच्या मुख्यमंत्र्यांना आसामच्या जनतेच्या त्रासाशी काहीही देणंघेणं नाही. त्यांना मदरशांची काळजी वाटते आहे. इतिहासाचा कमकुवत विद्यार्थी असलेल्या आसामच्या मुख्यमंत्र्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की जेव्हा संघी लोक इंग्रजांशी हातमिळवणी करत होते आणि तुरुंगात इंग्रजांकडे माफीची भीक मागत होते, तेव्हा याच मदरशांच्या लोकांनी इंग्रजांच्या विरोधात जिहादचा फतवा काढला होता.