अयोध्या, 21 मे : अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे. तर दुसरीकडे प्रभू रामचंद्राच्या मूर्तीसाठी आणलेल्या दगडावर काम सुरू आहे. या मूर्तीला बनवण्यासाठी दगड घडवण्याचं काम केलं जात आहे. मंदिराच्या बांधकामासोबतच प्रभू रामचंद्राची मूर्ती तयार करण्याचं काम सुरू झालं आहे. यासाठी कर्नाटकसह बंगळुरूच्या ५ मूर्तिकारांची टीम अयोध्येत दाखल झालीय.
कर्नाटकातील म्हैसूरहून आलेल्या दगडातून रामललाची मूर्ती तयार करण्यात येणार आहे. पाच वर्षाच्या बाळाच्या रुपात राम मंदिरात रामललाची मूर्ती स्थापन केली जाणार आहे. हातात धनुष्य आणि बाण असेल तर डोक्यावर मुकुट असणार आहे. इतकंच नाही तर राम मंदिर ट्रस्टचे वरिष्ठ सदस्य डॉक्टर अनिल मिश्रा यांनी सांगितलं की, राम भक्तांनी प्रभू रामचंद्रांची मूर्ती जिथे बसवण्यात येईल ते आसन सोन्याने मढवण्यात यावं अशी इच्छा व्यक्त केलीय. म्हणजेच जिथ प्रभू रामचंद्रांची मूर्ती असेल तेही सुवर्णजडीत असेल.
गंगोत्री ते रामेश्वरम… नागा साधूंची रोमांचक यात्रा, 4000 किलोमीटरचा प्रवास का आणि कसा करताय?
राम जन्मभूमी तिर्थ क्षेत्र ट्रस्टचे वरिष्ठ सदस्य अनिल मिश्रा यांनी सांगितले की, रामललाची मूर्ती तयार करण्यासाठी ट्रस्टचे खजिनदार गोविंद देव गिरी यांच्यासोबतची टीम युद्धपातळीवर तयारी करत आहे. वेळेत मूर्ती तयार होईल. २०२३ ऑक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंत मूर्ती तयार करून घेतली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.