राज्यसभा निवडणुकीसाठी हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी पार्टी भाजपला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचं टेन्शन वाढणार असल्याचेही म्हटले जात आहे. बहुजन विकास आघाडी चे तीन आमदार आहेत आणि त्यांनी जर भाजपला पाठिंबा दिला तर महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे.
हि निवडणूक कठीण जाणार असलीच म्हटलं जात आहे. पण, बहुजन विकास आघाडी ही महाविकास आघाडीलाच पाठिंबा देईल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना अँटोळे यांनी व्यक्त केला आहे.