Mumbai : राज्याच्या सत्तासंघर्षावर सध्या सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी सुरु आहे. यापार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा आपलं सरकार येईल, असा दावा काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केला आहे.
आज मुंबईत (Mumbai) महाविकास आघाडीच्या बैठकीत (Mahavikas Aghadi) बोलताना म्हणाले की “आपण एकत्र राहिलो तर विधानसभेत १८० आमदार निवडून येतील. सगळे एकत्र राहिलो तर त्याचा त्रास होईल, पण समन्वय साधला, सगळ्यांना सांभाळून घेतलं तर आपलं सरकार येईल,” असं थोरात मविआच्या नेत्यांना उद्देशून म्हणाले.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांची दुपारी बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.