अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणूक आणि येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकासाठी भाजपने मोर्चेबांधणी केली असून ठाकरे गटाच्या शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला जमीन दाखवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.
मुंबई महापालिकेवर अनेक वर्षापासून शिवसेनेचे वर्चस्व असल्यामुळे भाजपसाठी शिवसेनेचा ठाकरे गट प्रतिस्पर्धी आहे. त्यामुळे निवडणुकीत आपले मत शिवसेनेला जाऊ नयेत म्हणून भाजपने शक्कल लढवली आहे. “शिवसेना उद्धव ठाकरे यांना मत म्हणजे काँग्रेसला मत शिवसेना उद्धव ठाकरे यांना मत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला मत” असं प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले आहेत.
तर आता भाजपकडून शिवसेनेची मतं आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला याचा फायदा होणार का याकडे लक्ष लागलेले आहे. तर अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके विरूद्ध भाजपचे मुरजी पटेल अशी लढत होणार आहे. तर या निवडणुकीतही भाजपच्या या खेळीचा प्रभाव होणार का याकडे लक्ष लागणार आहे.मुंबई महापालिकेत शिंदे गटाचा महापौर नाही?मुंबई महापालिकेत शिंदे गटाला महापौरपदाचा उमेदवार देता येणार नाही हे जवळपास निश्चित आहे. कारण भाजपचे नेते अमित शाह गणेशोत्सव काळात मुंबईत आले होते त्यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेवर महापौर भाजपचाच होईल असं सांगितलं होतं. त्यामुळे शिंदे गटाला महापौरपदाचा उमेदवार देता येणार नाही हे स्पष्ट आहे.