मागील काही काळापासून दैंनदिन गरजेच्या वस्तूंचा किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या.त्यामुळे वंचित,शोषित,गरिबांना जगणे मुश्कील झाले.यांचा दबलेला आवाज बनण्यासाठी काँग्रेसने नेहमीच प्रयत्न केले मात्र केंद्रातील बधीर सरकारने याकडे कान वाकडा केलाच नाही.परिणामी हा घटक दयनीय अवस्थेकडे चालला आहे.मात्र राहुल गांधी यांच्या यात्रेमुळे त्यांच्यात नवचैतन्य संचारले असून लढण्याची उम्मीेद निर्माण झाली आहे.
केवळ मतांसाठी विविध प्रलोभने दाखवून या घटकाला आकर्षित केले गेले.भूलथापा देऊन प्रगतीचा मार्ग दाखवला मात्र प्रत्यक्षात त्यांच्यासाठी काही गेले नाही.
केवळ बड्या उद्योगपती मित्रांचे मात्र अनेक पटीने वाढले.ते देशातच नव्हे तर जगात सर्वात अधिक श्रीमंत होत गेले.त्या तुलनेत गरीब अधिक गरीब होत गेला.त्यामुळे या सर्व घटकाला आता राहुल गांधी यांच्याकडूनच अपेक्षा उरली आहे.