Bramhapuri : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 जयंतीचे औचित्य साधून शहरातील कुर्जा वार्ड येथे सम्राट अशोक बौद्ध समाजातर्फे बांधण्यात येणाऱ्या नविन बौद्ध विहार बांधकामाचे भूमिपूजन काल (दि. १४) माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी समाजबांधव व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे ब्रम्हपुरी येथील जनसंपर्क कार्यालयात आ. वडेट्टीवार यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.