माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन; पाथरी येथील क्रीडांगण निर्मितीचे भूमिपूजन
Chandrapur : युवकांतील खिलाडीवृत्ती जोपसण्यासाठी व विविध खेळ, मैदानी चाचणी तसेच व्यायामासाठी क्रीडांगण असणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री व ब्रम्हपुरी (Bramhapuri) विधानसभेचे आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केले.
राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) हे मंगळवारी (दि. ११) सावली (Savli) तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी सावली पंचायत समिती हद्दीतील पाथरी (Pathari) ग्रामपंचायत येथे मनरेगा अंतर्गत क्रीडांगण तयार करण्यात येणार असून सदर विकासकामाचे भूमिपूजन आ. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी माजी जिप बांधकाम सभापती दिनेश चिटणुरवार, सावली पसचे माजी सभापती विजय कोरेवार, सरपंच अनिता ठीकरे, प्रफुल्ल तुम्मे, माजी सरपंच राजेश सिद्धम, दिलीप जाधव यांच्यासह पाथरी येथील मान्यवर, खेळाडू व नागरिक आदी उपस्थित होते.