मुंबई, 12 एप्रिल : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जारी झाल्यानंतर अनेक ठिकाणी विरोध प्रदर्शन केलं जात आहे., या यादीत काही भाजप आमदारांची नावे वगळण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांकडून विरोध केला जात आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मंगळवारी 189 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. दरम्यान महाराष्ट्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपचे मुंबईतले नेते मैदानात उतरवण्यात आले आहे.
भाजपने मुंबईतल्या तीन नेत्यांवर विशेष जबाबदारी सोपवली आहे. भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, भाजप आमदार प्रसाद लाड आणि योगेश सागर यांच्याकडे विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. योगेश सागर आज कर्नाटकासाठी रवाना होणार असून प्रसाद लाड 14 एप्रिलला कर्नाटकला जाणार आहेत. या मुंबईच्या तीन नेत्यांसह आमदार राम शिंदे, जयकुमार रावल यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
बातमी अपडेट होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.