बिहार, 15 एप्रिल : बिहारमध्ये पुन्हा एकदा विषारी दारूकांड घडले आहे. मोतिहारी जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्यामुळे 22 जणांचा मृत्यू झाला आहे. 6 जणांचा मृत्यू झाल्याबद्दल प्रशासनाने दुजोरा दिला आहे. 10 पेक्षा जास्त लोकांची प्रकृती बिघडली आहे. सर्वांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील मोतिहारी जिल्ह्यातील पूर्वी चंपारण भागात 22 जणांचे संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आले. या सर्वांनी विषारी दारू प्यायल्याचे सांगितले जात आहे. तर 10 जणांची प्रकृती गंभीर आहे.
विषारी दारू प्यायल्यामुळे 6 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे, याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. परंतु, स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मोतिहारीच्या तुरकौलिया, हरसिद्धी आणि पहाडपूरसह इतर परिसरात 22 जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.
(धक्कादायक! पतीसमोर घरात घुसून पत्नीचं आणि मुलीचं अपहरण, पोलीस करतात तरी काय?)
पश्चिमी चंपारणचे डीआईजी जयंतकांत यांनी 6 जणांचा विषारी दारू प्यायल्यामुळे मृत्यू झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. पूर्वी चंपारण आणि इतर परिसरात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात 7 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मोतिहारीच्या तुरकौलिया, हरसिद्धी आणि पहाडपूरमध्ये शुक्रवारी दोन जणांचा मृत्यू झाला होता. या दोघांचा मृत्यू विषारी दारू प्यायल्यामुळे झाला असल्याचं सांगितलं गेलं. पण प्रशासनाने या दोघांचा मृत्यू डायरियामुळे झाला असल्याचं सांगितलं. त्यानंतर शनिवारपर्यंत 22 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले, त्यामुळे एकच खळबळ उडाली.
(डॉक्टर विसरले चक्क महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मशीन, पुढे झालं ते पाहून वाटेल आश्चर्य)
विषारी दारू प्यायल्यामुळे लोकांची प्रकृती बिघडली. अनेक जणांमध्ये अशक्तपणा आला. एकापाठोपाठ अनेक जणांची प्रकृती खालावत गेली. त्यामुळे वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
लक्ष्मीपुर गावात राहणाऱ्या उमेश राम नावाच्या तरुणाने सांगितलं की, शेतात गहू काढल्यानंतर 4 जणांना एकत्र येऊन दारू प्यायली होती. त्यानंतर 3 जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये त्याच्या सख्ख्या भावाचा सुद्धा समावेश होता. दरम्यान, 10 पेक्षा जास्त लोकांची प्रकृती चिंताजनक आहे आहे. सर्वांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.