मलप्पूरम : उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने किंवा लाँग विकेण्ड पकडून अनेक जण फिरायला गेले होते. मात्र या वेळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. पर्यटकांनी भरलेली नाव उलटून मोठी दुर्घटना घडली. यामध्ये 20 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
केरळमधील मलप्पूरम जिल्ह्यातील तनूरजवळ पर्यटकांची बोट उलटून 20 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन सकाळी तनूर दुर्घटनास्थळी भेट देणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे आज होणारे राज्यातील सर्व शासकीय विभागांचे अधिकृत कार्यक्रम रद्द करण्यात आली आहेत.
अपघाताच्या वेळी बोटीत सुमारे 40 लोक होते. राज्यमंत्री व्ही अब्दुरहमान यांनी माहिती दिली की केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा अपघात रात्री उशिरा झाला.
Malappuram boat accident: NDRF team deployed at the spot where a tourist boat capsized near Tanur in Malappuram district leaving atleast 21 people dead.#Kerala pic.twitter.com/tYGdd47IQU
— ANI (@ANI) May 7, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.