मुंबई, 20 एप्रिल : राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली. अदानी यांनी शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओकवर येऊन शरद पवार यांची भेट घेतली. दरम्यान त्यांच्यामध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय वतृळात चर्चेला उधाण आलं आहे.
भेटीचं कारण गुलदस्त्यात
तुमच्या शहरातून (मुंबई)
गौतम अदानी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली. मात्र ही चर्चा नेमकी कशावर झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. ही भेट चर्चेचा विषय ठरली आहे.
अदानींची पाठराखण
अदानीप्रकरणात जेपीसी स्थापन करावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली होती. मात्र शरद पवार यांनी अदानींची पाठराखण केली. अदानी प्रकरणात जेपीसीची आवश्यकता नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं होतं. अदानी यांना जाणून बजून टार्गेट करण्यात आलं असावं असं आम्हाला वाटत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं होतं. शरद पवार यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेस अडचणीत आले. त्यानंतर आज अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली. ही चर्चा नेमकी कशावर झाली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाहीये. मात्र या भेटीची चर्चा सुरू झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.