चंदिगढ, 23 एप्रिल: गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंह याला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. अमृतपाल सिंह याला मोगा जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार अमृतपाल यांच्यावर एनएसए अंतर्गत कारवाई करून त्याला आसामच्या डिब्रूगढ जिल्ह्यात रवाना करण्याची तयारी सुरू आहे.
पंजाब पोलीस, आयबीची संयुक्त कारवाई
पंजाब पोलीस आणि आयबीने संयुक्त कारवाई करत अमृतपाल याला मोगा जिल्ह्यातून अटक केली आहे. अमृतपाल गेल्या काही दिवसांपासून फरार होता. त्याला पकडण्यासाठी पंजाब पोलीस आणि भारतीय संरक्षण यंत्रणाकडून प्रयत्न सुरू होते. अमृतपाल याला पकडण्यासाठी नेपाळ बॉर्डरपर्यंत सर्च ऑपरेशन करण्यात आलं होतं. अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. काही दिवसांपूर्वीच अमृतपाल याचा खास साथीदार पप्पलप्रीत सिंह याला पोलिसांनी अटक केली होती. मात्र अमृतपाल हा पोलिसांना चकमा देत होता. अखेर त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या चौकशीमधून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.