मुंबई, 21 एप्रिल: राज्यातून मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना तातडीनं मुंबईत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मंत्र्यांना मुंबईत का बोलावण्यात आलं आहे, याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र या बातमीनं चर्चेला उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना मुंबईत बोलावलं आहे. त्यामुळे मुंबईबाहेर असलेले सर्व मंत्री मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. आज दुपारी एक वाजण्यापूर्वी सर्व मंत्री मुंबईत हजर राहणार आहेत.
बैठकिची शक्यता
तुमच्या शहरातून (मुंबई)
सर्व कार्यक्रम रद्द करून तातडीनं मुंबईत हजर राहा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांचा आदेश येताच सर्व मंत्री आपला दौरा अर्धवट सोडून मुंबईच्या दिशेन रवाना झाले आहेत. आज दुपारी एक वाजेपर्यंत सर्व मंत्री मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे सह्याद्रीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिमध्ये सर्व मंत्र्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. तातडीनं बैठक का बोलावण्यात आली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये.
आमदारांच्या अपात्रेबाबतच निकाल कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. तसेच सध्या राज्यात सुरू असलेल्या घडामोडी पहाता या बैठकीकडं राज्याचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना मुंबईत हजर राहण्याचे आदेश का दिले याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र या बातमीमुळे चर्चेला उधाण आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.