मुंबई, 15 मे : सीबीआयकडून समीर वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयकडून या प्रकरणात गुन्हा दाखल करताना कॉर्डलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणाचा वृत्तांत सादर करण्यात आला आहे. सीबीआयच्या एफआयआरमध्ये अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आरोपी समीर वानखेडे आणि इतर जणांनी हा कट कसा रचला याबद्दलची माहिती सीबीआयच्या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आली आहे.
सीबीआयकडून गंभीर आरोप
आर्यन खान एनसीबीच्या आणि खास करून आरोपी आणि पंच असलेल्या किरण गोसावीच्या ताब्यात आहे, हे दाखवण्यासाठीच आर्यनचा ताबा के पी गोसावीला देण्यात आला होता. वानखेडे यांच्या आदेशानुसारच के पी गोसावी आर्यनला घेऊन एनसीबी कार्यालयात आला होता, असं सीबीआयच्या एफआयआरमध्ये नमदू करण्यात आलं आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
एनसीबीच्या कार्यपद्धतीच्या बाहेर असूनही एका पंचाला अशा कारवाईवेळी मुक्तपणे वावरण्याचे आणि एनसीबी कार्यालयात येण्याचे अधिकार वानखेडे यांनी दिले. आरोपी असलेले समीर वानखेडे आणि आशिष रंजन यांनी त्यांच्या घोषित केलेल्या मालमत्तेपेक्षा अधिक संपत्ती मिळवली. समीर वानखेडे यांनी केलेल्या परदेश वारीचे म्हणावे तसे स्पष्टीकरण व्हिजिलन्स टीमच्या चौकशीत त्यांनी दिले नाही. महागडी घड्याळ आणि महागड्या गाड्या कुठून आल्या याचेही उत्तर देण्यात वानखेडे असमर्थ राहिले अस सीबीआयने एफआयआरमध्ये म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.