गुजरात राज्यात डिसेंबर होणाऱ्या निवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला आहे,राज्यातील काँग्रेस बरोबर भाजपचे नेते ही तिथे प्रचाराला गेले आहे.
या सर्वांमध्ये राज्यातील काँग्रेस नेते,माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या भाषणाची मोठी चर्चा होत आहे.त्यांच्या सभेला मोठी गर्दी होत आहे.त्यामुळे अनेक उमेदवार त्यांच्या भाषणाची मागणी करत आहे.
राज्यातील सर्व जनतेला माहीतच आहे प्रभावी आणि परिणामकारक भाषणात वडेट्टीवार महिर आहेत.जनतेचे प्रश्न आणि समस्या जवळून पाहिलेले हे नेते आहे. तळागाळातील लोकांच्या प्रश्नाचे त्यांना अचूक ज्ञान असल्याने ह्या निवडणुकीत ते त्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्नांना हात घालत आपलेसे करत आहे.
२७ वर्षापासून गुजरातमध्ये भाजपची सत्ता असल्याने मोठी नाराजी या पक्षाविरोधात दिसत आहे,भाकर फिरवली पाहिजे नाहीतर ती जळते यासह अनेक प्रमुख मुद्द्यांना हात घालत ते परिवर्तनाशिवाय विकास नाही,विकास साधण्यासाठी आता तुम्हाला काँग्रेसचीच निवड करावी लागेल.यामुळे त्यांच्या भाषणाचा मोठा बोलबाला सध्या गुजरात मध्ये दिसत आहे.
आपल्या व्यक्तीमत्वाने आणि वक्तृत्वाने ते जनतेचे लक्ष वेधून घेत आहे,विविध माध्यमेही त्यांच्या सभा कव्हर करण्यावर भर देत आहे.