मुंबई, 08 एप्रिल : इंडियन्सला यंदाच्या हंगामात पहिल्या सामन्यात पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर आज मुंबईचा सामना चेन्नई सुपर किंग्जसोबत असणार आहे. वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याआधी संघाला आणखी एक धक्का बसू शकतो. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
माजी क्रिकेटपटू एस बद्रीनाथ यांनी युट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटलं की, शुक्रवारी नेट सेशनवेळी जोफ्रा आर्चरला चेंडू लागला आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात तो खेळण्याबाबत सांशकता वाटते. जोफ्रा या सामन्यातून बाहेर पडल्यास मुंबई इंडियन्सला धक्का बसेल. कारण त्यांच्या ताफ्यात इतका अनुभवी वेगवान गोलंदाज नाही.
IPL 2023 : भारताच्या जर्सीत खेळायचं शाहबाजचं स्वप्न, CSKमध्ये दिग्गजांना नेटमध्ये करतो गोलंदाजी
मुंबई इंडियन्सचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह आधीपासूनच दुखापतीमुळे बाहेर आहे. त्यामुळे तो आयपीएलच्या १६ व्या हंगामात सहभागी झालेला नाही. त्याच्या जागी दुसरा खेळाडू घेतला तरी बुमराहसारखी कामगिरी होणं कठीण आहे. अशा परिस्थितीत आर्चरही बाहेर झाल्यास मुंबईला मोठा दणका बसेल. संघाकडे फलंदाजीसाठी पर्याय आहेत पण गोलंदाजांची बाजू कमकुवत दिसून येते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.