दिल्ली, 06 मे : आयपीएलचे सामने अटीतटीचे सुरू आहे. प्लेऑफसाठी चुरशीच्या लढती सुरू आहेत. अशातच आता आयपीएलमध्ये अनेक खेळाडू जखमी झाल्याने मैदानापासून दूर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे टीमचं मोठं नुकसान होत असून टेन्शन वाढलं आहे. आता सामन्याआधी दिल्ली कॅपिटल्स टीमला मोठा धक्का बसला आहे.
सर्वतोपरी प्रयत्न करूनही खेळल्या गेलेल्या ९ सामन्यांत दिल्लीला फार यश मिळालं असं पॉईंट टेबल पाहून दिसत नाही. त्याच दरम्यान, ६ मे रोजी होणाऱ्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी गोलंदाज मायदेशी परतला आहे.
वनडेत बाबर आजम सुस्साट! विराटसह 5 फलंदाजांना मागे टाकत केला विश्वविक्रम
एक खेळाडू अचानक तडकाफडकी मॅचआधीच घरी परतला आहे. त्याने हा निर्णय अचानक का घेतला याबाबत चर्चा सुरू झाली. त्यानंतर दिल्ली टीमने ट्विट करून याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
Owing to a personal emergency, Delhi Capitals fast bowler Anrich Nortje had to leave for South Africa late on Friday night. He will be unavailable for this evening’s game against Royal Challengers Bangalore. pic.twitter.com/lig7mfgLan
— Delhi Capitals (@DelhiCapitals) May 6, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.