अमरावतीमध्ये राणा दाम्पत्यांनी दहीहंडीचे आयोजन केले आहे. या क्रार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची रक्ततुला करण्यात येणार आहे. आजच्या या दहीहंडीच्या पार्श्वभूमीर राणा दाम्पत्यांकडून रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. या रक्तदान शिबीरावेळी वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रक्ततुला करण्यात येणार होती मात्र ती रक्ततुला आता रद्द करण्यात आली आहे. मात्र, फडणवीस यांच्या वजनाएवढं रक्तदान केलं जाणार आहे.
दरवर्षीप्रमाणे विदर्भातील मोठी दहीहंडी म्हणून प्रसिद्ध असलेली अपक्ष आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीची दहीहंडी आज रविवारी २१ ऑगस्ट रोजी साजरी करण्यात येत आहे. या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रक्ततुला देखील करण्यात येणार होती. मात्र, प्रोटोकॅालमुळे फडणवीस यांची रक्ततुला रद्द करण्यात आली आहे. मात्र, फडणवीस यांच्या वजना इतकं रक्तदान केलं जाणार आहे.