बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणला सेटवर प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दीपिका सध्या हैदराबादमध्ये तिच्या आगामी सिनेमाचे शूटिंग करत आहेत. या सिनेमात दीपिका दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससोबत दिसणार आहेत. हैदराबादच्या रामोजी फिल्मसिटीमध्ये या सिनेमाचे शूटिंग सुरू आहे. सेटवरच दीपिकाची प्रकृती बिघडल्याने तिला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण आता तिची प्रकृती सुधारल्याचे म्हटले जात आहे.
दीपिका सध्या ‘प्रोजेक्ट के’ या सिनेमाचे शूटिंग करत आहे. अचानक तिच्या हृदयाचे ठोके वाढल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आता तिची प्रकृती सुधारली असून ती सेटवर परतली आहे. तिने शूटिंगलादेखील सुरुवात केली आहे. 12 जूनला तिला अस्वस्थ वाटत असल्याने ती हैदराबादमधील एका रुग्णालयात गेली होती.