न्यूयॉर्क, 04 एप्रिल : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी न्यूयॉर्कमध्ये आत्मसमर्पण करण्यासाठी पोहोचले. ट्रम्प हे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष असतील ज्यांच्यावर गुन्हेगारी अभियोग चालवण्यात आला आहे. एक औपचारिकता म्हणून त्यांच्यावर आज २०१६ च्या निवडणूक प्रचारावेळी एका पॉर्नस्टारला पैसे दिल्याचा आरोप केला जाईल. ट्रम्प हे ला गार्डिया विमानतळावर उतरले. त्यानंतर ट्रम्प टॉवरमध्ये वास्तव्यास गेले. मंगळवारी दुपारी मॅनहॅटन कोर्टहाऊसमध्ये जाण्याआधी ते इथेच थांबले.
ट्रम्प न्यायालयात हजर राहण्याआधी कोर्टहाऊससह ट्रम्प टॉवरबाहेरही कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता. अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आल्या आहेत. न्यूयॉर्कचे महापैर एडम्स यांनी इशारा दिला होता की, ट्रम्प यांच्या ऐतिहासिक अभियोगावेळी आक्रमकतेने आंदोलन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला ताब्यात घेतंल जाऊ शकतं. तसंच या सर्व प्रकरणावर ट्रम्प यांचे वकील जो टेकोपिना यांनी सांगितले की, या सगळ्या पोकळ गप्पा आहेत. ट्रम्प यांनी लढ्यासाठी कंबर कसली असून त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं ते सिद्ध करतील.
Elon Musk यांना झालंय काय? ट्विटरची चिमणी बदलली, दिसतोय कुत्र्याचा लोगो
डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१६ मध्ये आपल्या निवडणूक प्रचारावेळी अडल्ट फिल्ममध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीला गुपचूप पैसे दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. मॅनहॅटन ग्रँड ज्युरींनी गेल्या आठवड्यात सुनावणी केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प मंगळवारी मॅनहॅटन न्यायालयात हजर होतील. अभियोगाला सामोरे जाणारे ते पहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष असतील.
ट्रम्प यांच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे. सुनावणीवेळी ट्रम्प यांच्यावरील आरोपांचे वाचन केले जाईल. ही प्रक्रिया जवळपास १० ते १५ मिनिटे चालेल. ट्रम्प यांचे २०२४ मध्ये पुन्हा व्हाइट हाऊसमध्ये जाण्याचं स्वप्नही यामुळे भंगणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.