मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. आता फडणवीस आणि एकनाथ शिंदे सरकार स्थापन होणार आहे. त्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. फडणवीस आणि एकनाथ शिंदे आजच राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचे समजत आहे, त्यानंतर आज किंवा उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे हे गोव्याहून मुंबईकडे निघाले आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आज दुपारी ३. ०० ते ३ः३० दरम्यान, राजभवनावर जाणार आहे. यावेळी फडणवीस आणि शिंदे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर फडणवीस सरकारचा आज संध्याकाळी किंवा उद्या शुक्रवारी शपथविधी होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे शपथ घेतील. त्यांच्यासोबत इतर आणखी ५ नेते हे मंत्रिपदाची शपथ घेण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.