मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्यासोबत ४० आमदारांना घेऊन दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र सदनामध्ये सर्व आमदारांसाठी रूम्स सुद्धा बूक करण्यात आल्या आहेत. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे राज्य सरकारची मोठी नाचक्की झाली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीत दाखल होणार आहेत.
महाराष्ट्र सदनातील बॅक्वेट हॉल आणि प्रेस कॉन्फरन्स हॉल बुक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एकनाथ शिंदे हे केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये देखील जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सदनात अनेक रूम बुक करण्यात आल्या आहेत. जवळपास 40 आमदार येणार असल्याची देखील माहिती आहे. विविध रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे केंद्रीय मंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. यावेळी केंद्रीय मंत्री आश्विणी वैष्णव आणि नितीन गडकरी यांचीही भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.