पक्षावर नाराज असलेले एकनाथ शिंदे भाजपात प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय. मोठी बाब म्हणजे एकनाथ शिंदे एकटे गेले नसून त्यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय असलेले तब्बल १७ आमदार आणि पदाधिकारीही सुरतमधील एका हॉटेलात थांबले असल्याची सुत्रांची माहिती आहे. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनीही त्यांचा दिल्ली दौरा रद्द केला आहे. आज (मंगळवारी) दुपारी १ वाजेनंतर शिंदे हे पत्रकार परिषद घेणार असंही बोललं जातंय. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी ढवळाढवळ सुरू झाली आहे.
- हे आमदार आहेत नॉट रिचेबल
१) स्वतः एकनाथ शिंदे, ठाणे
२) अब्दुल सत्तार, सिल्लोड
३) प्रताप सरनाईक, ठाणे
४) संदीपान भुमरे, पैठण
५) संजय शिरसाठ, औरंगाबाद
६) बालाजी किणीकर, अंबरनाथ
७) विश्वनाथ भोईर, कल्याण पश्चिम
८) भरत गोगावले, महाड
९) शहाजी पाटील, सांगोला
१०) महेंद्र थोरवे, कर्जत
११) महेंद्र दळवी, अलिबाग
१२) संजय रायमूलकर, बुलडाणा
१३) संजय गायकवाड, बुलडाणा
१४) महेश शिंदे, सातारा
१५) संजय राठोड, यवतमाळ
१६) श्रीनिवास वनगा, पालघर
१७) रमेश बोरणारे, वैजापूर
- शिंदेच्या नॉट रिचेबल असण्यावर नारायण राणेंचं सूचक वक्तव्य :
शिंदे गुजरातच्या सूरतमधील ग्रॅंड भगवती हॉटेलमध्ये असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्याचे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही म्हटले आहे. मात्र ते कुठे आहेत असं कधी सांगायचं असतं का, असा सवाल त्यांनी विचारला. अशा गोष्टीवर कोणतेही भाष्य करु नये. अन्यथा त्याला काहीही अर्थ उरत नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, शिवसेना नाराज आमदार आणि शिंदे नॉट रिचेबल असल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचा संपर्क करण्यात आला आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी पक्षाकडून आपआपल्या आमदारांना संपर्क तात्काळ सुरु केला आहे.