देवेंद्र फडणवीस पुन्हा दिल्लीला गेले आहेत. बंडखोर एकनाथ शिंदे देखील दिल्लीला जाण्याची शक्यता आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेऊन स्ट्रॅटेजी ठरवणार असल्याची सूत्रांची माहिती.
राज्याच्या राजकारणात सर्वकाही घडवूनही यामध्ये आपला काही संबंध नसल्याचे भाजपाकडून भासवण्यात आल्याचा आरोप सामनामधून करण्यात आला आहे. याचा दाखला देताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खा. रावसाहेब दानवे यांची परस्पर विरोधी मतांच्या विधानांचे उदाहऱण देण्यात आले आहे. एकीकडे चंद्रकांत पाटील हे शिवसेना पक्षात काय सुरु आहे तो त्यांचा पक्षांतर्गतचा विषय आहे. त्याच्याशी भाजपाचा काही संबंध नसल्याचे सांगत असले तरी दुसरी गुडघ्याला बाशिंगबांधून खा. दानवे तयार असल्याचाही आरोप कऱण्यात आला आहे.