शिंदे गटातील मंत्र्यांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत, प्रसिद्धिसाठी परस्पर नवनव्या घोषणा करणाऱ्या मंत्र्याना फडणवीसांनी तंबी दिल्याची माहिती समोर आली आहे.(maharashtra politics crisis Devendra Fadnavis slammed Abdul Sattar )
शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर ४२ दिवसांनी मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. अजून दुसरा टप्पा पार पडायचा आहे. अशातच मंत्रीपद मिळल्यानंतर काही मंत्र्यांनी प्रसिद्धीसाठी घोषणाचा सपाटाच लावला असल्याची धक्कादायक बाब समोर आली.
दरम्यान, कोणताही सारासार विचार न करता घोषणा करु नका. कोणताही निर्णय परस्पर जाहीर करु नका. मनात येईल त्या घोषणा करत सुटू नका. असे खडेबोल उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अब्दुल सत्तार यांच्यासह इतर मंत्र्यांना सुनावले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही समज दिली असल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
काल सोमवार मंत्रीमंडळ बैठक पार पडली. या बैठकीमध्ये केंद्राची प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना राज्यातही नवीन सन्मान योजना राबवावी किंवा केंद्रातील योजनेत राज्याचा काही वाटा समाविष्ठ करून शेतकऱ्यांना मदत योजना सुरू करण्यासंदर्भात विचारमंथन सुरू होते. दरम्यान, यासंदर्भातील माहिती बातमी प्रसारमाध्यमांमध्ये लिक झाली.
ही बाब फडणवीसांना समजली असता त्यावरुन मंत्रीमंडळ बैठकीतच कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना धारेवर धरलं. आणि ही माहिती फोडल्याबद्दल जाब विचारला. अजून कोणताही निर्णय झाला नसताना ही माहिती तुम्ही जाहिर कशी केली? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला. असल्याची माहिती समोर आली.