Mumbai : गेल्या काही दिवसांपासून मुंबई (Mumbai) आणि परिसरात आग (Fire) लागण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. आज (दि. 22) मुंबईच्या धारावी झोपडपट्टीत (Dharavi) भीषण आग (Fire Incident) लागल्याची माहिती समोर आली आहे. ही आग शाहुनगर परिसरात असलेल्या कमलानगर (Kamla Nagar) झोपडपट्टीमध्ये लागली आहे. आग इतकी भीषण होती की आगीचे लोट बाहेर पडत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील शाहूनगर (Shahu Nagar) परिसरातील कमलानगर झोपडपट्टीत भीषण आग (Fire) लागली आहे. या आगीमध्ये 25 पेक्षा जास्त घर (Houses) जळून खाक झाली आहेत. घटनेची माहिती मिळतच अग्निशमन दलाच्या (Fire Brigrade) गाड्या घटनास्थळावर दाखल होऊन आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान नागरिक झोपेत असताना अचानक ही आग लागली. पहाटे चार वाजता ही आग लागल्याने नागरिकांचा एकच गोंधळ उडाला. सुदैवाने आतापर्यंत या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
ही आग एवढी भीषण होती की, अग्निशमन दलाच्या (Fire Brigrade) 20 ते 25 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. धारावीतील (Dharavi) शाहुनगरमधील कमलानगर म्हणजे, मोठा दाटीवाटीचा भाग. या झोपडपट्टी परिसरात अनेक लहान मोठी घरं अगदी दाटीवाटीनं एकमेकांना खेटून उभी आहेत. याशिवाय या ठिकाणी अनेक लहान दुकानंही आहेत. ज्या परिसरात आग (Fire) लागली, त्या परिसरात लेदरची अनेक दुकानं आहेत. तसेच, अनेक लहान-मोठे कपड्यांचे कारखानेही आहेत. त्यामुळे आग आणखी वाढत होती. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलासोबत शाहुनगर पोलिसांनी (Police) घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. व तात्काळ नागरिकांना घरातून बाहेर काढून परिसर मोकळा केला.
आग इतकी भीषण होती की, आजुबाजूच्या परिसरात धुराचे लोळ पसरले होते. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धारावी (Dharavi) कमलानगरची आग आटोक्यात आली आहे. सध्या फायर कूलिंगचं काम सुरू आहे. 50 ते 60 गारमेंटची दुकानं आणि घरं या आगीत आतापर्यंत जळून खाक झाली आहेत.