चंद्रपूर, प्रतिनिधी : जिल्ह्यातील पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या चिमूरचे आराध्यदैवत ‘भगवान श्रीहरी बालाजी’ यांची ‘घोडारथ’ यात्रा २६ जानेवारीपासून सुरू असुन २६ दिवसांनी महाशिवरात्रीला यात्रेची सांगता होणार आहे. सोमवारला गोपालकाला निमित्त राज्याचे माजी मंत्री, काँग्रेस नेते तथा ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी युवा सामाजिक कार्यकर्ता दिवाकर निकुरे यांच्यासह श्रीहरी बालाजी मंदिर येथे येऊन मनोभावे ‘श्रीं’ चे दर्शन घेत चिमूर विधानसभेतील जनतेच्या भल्यासाठी भगवान श्रीहरी बालाजी यांना साकडे घातले.
दरम्यान श्रीहरी बालाजी देवस्थान, चिमूर ट्रस्टचे अध्यक्ष निलम राचलवार, विश्वस्त डॉ. मंगेश भलमे, नैनेश पटेल, धरमसिंह वर्मा यांनी आमदार वडेट्टीवार यांचे मंदिराच्या वतीने स्वागत केले व कार्यालयात हितगुज केली. यावेळी युवा सामाजिक कार्यकर्ते दिवाकर निकुरे, जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष भीमराव ठावरी, माजी जि. प. सदस्य गजानन बुटके, प्रा. राजू दांडेकर, राजेंद्र लोणारे, सेवानिवृत्त प्राचार्य सुधीर पोहणकर, सुधीर पंदिलवार, योगेश ठुने, सोनु कटारे, श्याम बागडे, बंडू गेडाम, कमलेश बांबोडे, अमेय नाईक, शुभम भोपे यासह कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
इंदिरा गांधी चौक येथे आ. वडेट्टीवारांच्या हस्ते महाप्रसाद वितरण
इंदिरा गांधी चौक येथे काँग्रेसचे सामाजिक कार्यकर्ते दिवाकर निकुरे यांच्यातर्फे आयोजित महाप्रसाद वाटप कार्यक्रमात आ. विजय वडेट्टीवार यांनी स्वतः उपस्थित राहून महाप्रसादाचे वितरण केले. यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गजानन बुटके, दिवाकर निकुरे, राजेंद्र लोणारे, राजू दांडेकर, गजानन बुटके, सुधीर पंदिलवार, माजी सभापती शांताराम सेलवटकर, जावाभाई, रत्नाकर विटाळे, संदीप कावरे व चमू, कमलेश बांबोडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.