Chandrapur : धर्म माणसाला सुसंस्कृत घडविण्यासाठी असतो. त्यामुळे सामाजिक कार्य करण्याची शिकवण प्रभुंच्या विचारातुन मिळत असते. ईश्वराला आपण नेहमीच काहीतरी मागणं मागत असतो. पण आपण ईश्वराला काय देतो. ईश्वराला आपल्याकडुन हेच अपेक्षित आहे की, आपण इतरांच्या दुःखावर फुंकर घातली पाहिजे. कारण खरी माणुसकी यातच आहे, असे मौलिक विचार राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार (MLA Vijay Wadettiwar) यांनी केले.
ते ब्रम्हपुरी (Bramhapuri) येथील पेठवार्डस्थित अनुग्रह फेलोशिप (प्रार्थना स्थळ) बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे (Zila Parishad) माजी सदस्य डॉ. राजेश कांबळे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका काँग्रेस (Congress) कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, नगरपरिषदेचे नियोजन सभापती महेश भर्रे, डेविड बाबय्या तुपदी हे उपस्थित होते.
पुढे बोलतांना आ. विजय वडेट्टीवार (MLA Vijay Wadettiwar) म्हणाले की, श्रध्दा डोळस असली पाहिजे, आपण अंधश्रद्धा बाळगु नये. अलीकडे समाजातील दृष्ट प्रवृत्तींकडून धर्मांधतेचे विष समाजात पेरले जात आहे. अश्या वाईट प्रवृत्तींना थारा न देता आपण निर्व्यसनी सद्गुणी राहावे व निराधारांना आधार द्यावे हेच येशूला अपेक्षित आहे. सामाजिक कार्य करण्याची शिकवण प्रभु येशूंच्या विचारातुन मिळत असते. त्यामुळे आपण सुध्दा चांगले विचार समाजात पेरावे आणि समा घडविण्यात आपले योगदान द्यावे, असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.
यावेळी ब्रम्हपुरी (Bramhapuri) येथील ख्रिश्चन (Christian) समाज भवनाच्या निर्माणासाठी येत्या काळात 15 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे यावेळी माजी मंत्री तथा आ. विजय वडेट्टीवार (MLA Vijay Wadettiwar) म्हणाले. कार्यक्रमास ब्रह्मपुरी (Bramhapuri) तालुका व परिसरातील ख्रिश्चन बांधव तथा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.