जयपूर, 19 मे : सीबीआय अधिकारी असल्याचा बनाव करून अपहरण आणि फसवणूक करणाऱ्या एका महिलेसह सहा जणांना अटक करण्यात आळी आहे. मामचारी पोलिसांनी आरोपींकडून दोन एसयुव्ही कार, पोलीस अधिकारी, सीबीआय आणि पत्रकारांची अनेक बनावट ओळखपत्रे जप्त केली. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून पाच आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय तर महिलेला तुरुंगात पाठवण्यात आलं.
मामचारी पोलीस ठाण्याचे अधिकारी ओमेंद्र सिंह यांनी सांगितलं की, मुस्कान अजयसिंह, मनीश कमलेश, प्रवीण रामब्रिज, मौहरसिंह रामफूल, अजयसिंह विजयसिंह, बिहारीलाल रामसहाय अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मामचारी पोलिस ठाण्यात यांच्याविरोधात वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
‘तोंड उघडलंस तर जीव घेईन’, 10 वीच्या विद्यार्थिनीला फरफटत नेलं, मनसुन्न करणारी घटना
आरोपींनी गंगापूर, सपोटरा आणि दिल्लीतही अनेकांची फसवणूक केलीय. इंटरनेटवरून सीबीआयची डुप्लिकेट आयडी तयार करून फोटो आणि नाव लावून लोकांना धमकावत असत. लोकांकडून पैसे उकळत होते. आरोपी ऐशोआरामात आयुष्य जगण्यासाठी फिल्मी स्टाइल फसवणूक करण्याचं काम करत होते.
दोन गाड्यांमधून बुधवारी सर्वजण करसाई इथल्या मीना वस्तीत पोहोचले होते. तिथे घरी झोपलेल्या शिवसिंह रामदयाल आणि त्यांची पत्नी मनिषा यांना उचलून नेलं. वाटेत शिवसिंहला मारहाणसुद्धा केली. मनिषाने आरडाओरडा केल्यानं इतर लोक जागे झाले आणि स्थानिकही घटनास्थळी पोहोचले. दाम्पत्याची सुटका स्थानिकांनी केली. आरोपींनी अधिकारी असल्याची बतावणी करत धमकी दिली. यावर शंका आल्याने नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपींना अटक केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.