चंद्रपूर, विशेष प्रतिनिधी : JEE/NEET, MHT-CET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माजी मंत्री व ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली करिअर मार्गदर्शन शिबिराचे सिंदेवाही येथे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक डॉ. विनोद आसुदानी हे उपस्थित राहणार असून ते या शिबिराचे प्रमुख वक्ते असणार आहे.
उद्या शनिवारी (दि. २४) सकाळी ११ वाजता श्रवण लॉन, मुल रोड, सिंदेवाही येथे या शिबिराचे आयोजन होणार आहे. सदर करिअर मार्गदर्शन शिबीर निःशुल्क असून या शिबिरात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत नोट्सचे वितरण करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आधार फाऊंडेशन बहुउद्देशीय शिक्षण संस्था, नागपूरचे संस्थापक दिनेश मलिये, मुकेश चौबे यांनी केले आहे.