श्रीनगर : G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट आहे. सुरक्षा दलाचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याच दरम्यान राजौरी आणि बारामुल्ला परिसरात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू झाली आहे.
शनिवारी बारामुल्ला चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बारामुल्लाच्या करहामा कुंजर भागात ही चकमक सुरू आहे. दरम्यान, राजौरीतील कंडी जंगलात सध्या दहशतवादविरोधी कारवाई सुरू आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही भागात किमान 8 ते 9 दहशतवादी असल्याचं सांगितलं जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. सर्च ऑपरेशन सुरू असताना एक घरातून अचानक गोळीबार सुरू झाला. त्याला सुरक्षा दलाच्या जवानांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. हा दहशतवादी लष्कर ए तोयबाच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे.
#WATCH | J&K: Encounter underway between terrorist and security personnel in Karhama Kunzer area of Baramulla
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/9YvsH1nADA
— ANI (@ANI) May 6, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.