पुणे, 29 मार्च : भाजप नेते आणि खासदार गिरीश बापट यांची प्रकृती गंभीर आहे. पुण्यात दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू आहेत. प्रकृती ठीक नसतानाही पुण्यात कसबा पेठ पोट निवडणुकीत ते व्हिलचेअरवर बसून प्रचारासाठी मैदानात उतरले होते.
गिरीश बापट यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
गिरीश बापट यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावत चालली आहे. त्यांच्यावर घरीच उपचार केले जात होते. मात्र बुधवारी त्यांची प्रकृती जास्त खालावल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
तुमच्या शहरातून (पुणे)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.