चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठ सिनेट निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. येत्या ४ सप्टेंबर रोजी निवडणुक असली तरी उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी १८ ऑगस्ट रोजी व्यवस्थापन गट सिनेट सदस्य म्हणून प्राचार्य डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, प्रा. डॉ. विवेक शिंदे, स्वप्निल दोंतुलवार, नितीन पुगलिया, शिवानी विजय वडेट्टीवार व तनुश्री धर्मरावबाबा आत्राम बिनविरोध विजयी झाले.
शिवानी वडेट्टीवार ह्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस असून त्यांनी या माध्यमातून राज्यभर युवक युवतींचे मोठे संघटन उभे केले आहे.लोकोपयोगी विविध उपक्रम राबवून त्या नेहमीच युवा वर्गाच्या संपर्कात राहतात,त्यांच्या प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देतात.
शिवानी वडेट्टीवार या केवळ चंद्रपूर, विदर्भापुरत्या मर्यादित नसून त्यांना मानणारा मोठा वर्ग राज्यभर आहे.समाजातील विविध घटक जसे साहित्यिक,लेखक,कवी,उद्योग, शिक्षण,आरोग्य यासह विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तीशी त्यांचा असलेला थेट जनसंपर्क देखील मोठा आहे.
त्या स्वतः उच्च शिक्षित असून राजकारणासोबतच समजाकरणात देखील त्या अग्रेसर आहे.आरोग्य,शिक्षण,सामाजिक प्रश्नावर त्या सातत्याने पाठपुरावा करत असतात.
अश्यातच त्यांना गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याने विद्यार्थी तसेच विद्यापीठ प्रशासनाला त्यांचा ज्ञानाचा आणि अनुभवाचा मोठा फायदा होणार आहे.
त्यांच्या निवडीने समर्थकांत उत्साहाचे वातावरण आहे.