टॅक्स सुधारणा करण्याच्या नावावर गब्बर सिंग टॅक्स लावून जनतेला लुटण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केले आहे. जीवनावश्यक वस्तू,शालेय वस्तू ,खादी एवढेच काय लहान मुलांच्या दुधावर देखील टॅक्स लावणारा हा एकमेव पंतप्रधान देशाने पहिला आहे.
असा पंतप्रधान पुन्हा होणे नाही,चांगल्या कामासाठी नव्हे तर वाईट गोष्टींसाठी म्हणून यांची इतिहासात नोंद होईल.टॅक्स असूच नये या मताची मी नाही मात्र तो किती असावा हे मात्र ठरवले पाहिजे.देशातील लोकांचे उत्पन्न,पगार याचा ताळमेळ घालून नागरिकांना सन्मानाने जगता येईल अशी काहीतरी तडजोड त्यात असावी.दोन वेळच्या जेवणाची लाचारी करावी लागत असेल तर काय अर्थ आहे.
काँग्रेसच्या काळात देखील अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती.तेव्हा थोडी महागाई वाढली तरी टिवटिव करणारी गँग आता शांत बसली कारण त्यांना भीती आहे.मात्र काँग्रेस विरोधक म्हणून सर्वसामान्यांसाठी लढत आहे.लढत राहील त्यामुळेच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत त्याचा प्रत्यय पाहायला मिळतो.