2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हेरा फेरी’ या चित्रपटाला प्रेक्षक आजही आवडीनं पाहतात. या चित्रपटामधील अक्षय कुमार , सुनील शेट्टी आणि परेश रावल या त्रिकुटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. आता प्रसिद्ध चित्रपट निर्माते फिरोज नाडियादवाला यांनी हेरा फेरी-3 या चित्रपटाबाबत एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
मुलाखतीमध्ये फिरोज नाडियादवाला यांनी सांगितलं, ‘हेरा फेरी-3 या चित्रपटामध्ये अक्षय, परेशजी आणि सुनील ही चित्रपटाची जूनीच स्टार कास्ट काम करेल. आमच्याकडे स्टोरी तयार आहे. सध्या आम्ही या चित्रपटावर काम करत आहोत. या चित्रपटाच्या दोन पार्ट्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाच्या स्टोरी आणि स्क्रिनप्लेकडे आम्हाला विशेष लक्ष द्यावे लागेल. ‘ पुढे फिरोज यांनी सांगितलं की, ‘काही कलाकारांची नावं शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत. लवकरच या चित्रपटाबाबत घोषणा करण्यात येईल.’
ट्रेंड होत आहे हेरा फेरी 3
फिरोज नाडियादवाला यांनी हेरा फेरी या चित्रपटाबाबत माहिती दिल्यानंतर सोशल मीडियावर हेरा फेरी 3चा ट्रेंड होत आहे. हेरा फेरी चित्रपटाचे काही मीम्स सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. प्रेक्षक हेरा फेरी-3 या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाचा ‘फिर हेरा फेरी’ हा दुसरा भाग 2006 मध्ये रिलीज झाला होता. हेरा फेरी या चित्रपटामध्ये परेश रावल यांनी बाबू भाई ही भूमिका तर अक्षयनं राजू ही भूमिका साकारली. सुनीलनं श्याम ही भूमिका साकारली होती. हेरा फेरी आणि फिर हेरा फेरी या दोन्ही भागांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. चित्रपटामध्ये जॉनी लिव्हर, बिपाशा बासू, तब्बू या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली होती.