Big Boss MC Stan : बिग बॉसच्या यंदाच्या सिझनमध्ये सगळेचं स्पर्धक विचित्र आहेत. कधी कोण काय पराक्रम करेल सांगता येत नाही. त्यातच एमसी स्टॅन तर वेगळ्याचं लेव्हवलचा खेळ खेळतो. तो यावेळी सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय चेहरा आहे. स्टॅन फारच कमी बोलत असला तरी तो बोलतो तेव्हा सगळ्यांचीच बोलतीच बंद करतो. तो घरातच नाही तर सोशल मिडियावर प्रंचड प्रसिद्ध आहे. तो त्याच्या बोलीभाषेमूळेही चर्चेत असतो. त्याचे अनेक डॉयलॉग हे सोशल मिडियावर व्हायरल आहेत.
तो त्याच्या परर्सनल लाईफमूळेही चर्चेत असतो. बिग बॉसमध्ये येतांनाचं त्याने सलमानला त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल सांगितलं होतं, त्यानंतर अनेकदा तो त्याची गर्लफ्रेंड बूबाबद्दल चर्चा करताना दिसतो. यावेळी त्याने आपली प्रेमकहाणी तर सांगितलीच, शिवाय बुबाच्या घरच्यांनासोबत काय केलं हेही सांगितले.
‘बिग बॉस 16’ चा कालचा एपिसोडमध्ये अंकित गुप्ता आणि प्रियांका चहरशी बोलतांना एमसी स्टॅनने त्याच्या लव्ह लाइफबद्दल मोठे खुलासे केले. प्रियांकाने त्याला विचारलं की तिची मैत्रीण बुबाच्या घरच्यांना त्यांच्या प्रेमाबद्दल माहिती आहे का ? त्यावेळी त्याने खुलासा केला की तो 40 लोकांसह तिच्या पालकांच्या घरी त्यांच्या नात्याबद्दल बोलण्यासाठी गेला होता. तो म्हणाला की तो तिच्या वडिलांच्या घरी तिचा हात मागण्यासाठी गेला होता पण तिच्या आई-वडिलांना ते मान्य नव्हतं. त्यावेळी त्याने बुबाच्या आई-वडिलांना सांगितलं की एकतर हे नातं सन्मानाने मान्य करा नाहीतर मी तिला पळवून घेवून जाईलं.
भारतासह जगभरात तो आपल्या रॅप गाण्यांद्वारे खूप लोकप्रिय आहे. त्याच घरातल्या ठराविकचं लोकांसोबत जास्त जमतं. आपल्या हटक्या बोलिभाषेमूळे किंवा त्याच्या अतरंगी राहणीमानामूळे तो चर्चेत राहणारा एमसी स्टॅन हा प्रसिद्ध रॅपर आणि हिप-हॉप गायक आहे.