Nashik : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी श्रुती नाईक व अलका गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पश्चिम (Nashik West) मतदारसंघातील शेकडो महिलांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षात प्रवेश केला. शालिमार येथील मध्यवर्ती कार्यालयात हा सोहळा पार पडला.
यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, महापालिकेचे माजी गटनेते विलास शिंदे, युवासेना जिल्हाधिकारी राहुल ताजनपुरे, उपजिल्हाप्रमुख देवानंद बिरारी, महेश बडवे, सचिन मराठे, मध्य नाशिक विधानसभाप्रमुख बाळासाहेब कोकणे, सुभाष गायधनी, माजी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, महिला आघाडीच्या पदाधिकारी प्रेमलता जुन्नरे, मंदा दातीर आदींच्या हस्ते शिवबंधन बांधून सर्वांचे पक्षात स्वागत करण्यात आले. प्रवेश करणाऱ्यांमध्ये मनिषा पाटील, पुष्पा राणे, वैशाली आहेर, छाया पंगे, सुरेखा पोरके, शोभा मसोळ, हेमलता देशपांडे, स्वाती खंडारे, सुलभा कदम, भारती बहिराम, वंदना नामाडे, ज्योती करमसे, मंगला कवडे आदींचा समावेश होता.
ना घर का, ना घाट का अशी स्थिती गद्दारांची
उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांची शिवसेना (Shivsena) हीच खरी शिवसेना आहे, हे लोकांना आता पटू लागले आहे आणि त्यामुळेच अनेक लोक त्या पक्षात प्रवेश करत आहेत. महिलाही त्यात मागे नाहीत हे प्रवेश सोहळ्यावरून दिसून आले, असे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी सांगितले. गद्दारांनी पक्ष सोडला असला तरी त्यांची गत काय झाली हे महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे. ना घर का, न घाट का अशी त्यांची स्थिती झाली आहे. त्यामुळे ते आता काहीही बरळत आहेत, असे संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांनी आपल्या भाषणात सांगितले. तर नाशकात शिवसेना ठाकरे गट भक्कम असून कोणत्याही क्षणी निवडणुका लागल्या तरी त्यास सामोरे जाण्याची आमची तयारी असल्याचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी आपल्या मनोगतात नमूद केले.