मुंबई, 25 एप्रिल : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ७ ते ११ जून दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना खेळेल. बीसीसीआयने 15 जणांचा संघ जाहीर केला आहे. ऋषभ पंतच्या जागी यष्टीरक्षक म्हणून केएस भरतला संधी देण्यात आलीय. कसोटी संघात अजिंक्य रहाणेचं पुनरागमन झालंय. तर सूर्यकुमार यादवला मात्र संधी मिळाली नाही.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारताकडून सलामीला कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांची जोडी दिसेल. गिल गेल्या दोन महिन्यांपासून सर्वच फॉरमॅटमध्ये फॉर्ममध्ये असून त्याने सर्व प्रकारात शतक झळकावलं आहे. तर रोहित शर्मानेही याआधीच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत शतक झळकावलं होतं.
🚨 NEWS 🚨#TeamIndia squad for ICC World Test Championship 2023 Final announced.
Details 🔽 #WTC23 https://t.co/sz7F5ByfiU pic.twitter.com/KIcH530rOL
— BCCI (@BCCI) April 25, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.