आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती कमी होऊन देखील घाऊक बाजारात पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी न केल्याने महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली त्याचा फटका सर्वसामान्य नागरीक,व्यापारी,उद्योजक तसेच विविध घटकांना बसला.
दळणवळणसाठी मोठ्या प्रमाणावर इंधनाची गरज असते तसेच यांत्रिकी करणामुळे शेतकऱ्यांना देखील इंधन मोठ्या प्रमाणावर लागते मात्र या सर्व घटकाला न्याय न देता इंधनाच्या माध्यमातुन करोडो रुपये कमवून देखील जनतेला त्या पैशातून मूलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरलेल्या केंद्रातील भाजप सरकार विरोधात मोठा असंतोष आहे.
राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेत देखील मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिक सहभागी होत जणू केंद्रातील भाजपा सरकारला त्यांच्या चुकीच्या धोरणाला योग्य संदेश देत आहे.