Maharashtra Politics : सत्ताधारी भाजपप्रणित एनडीएला टक्कर देण्यासाठी विरोधकांची एकवटलेली वज्रमूठ आहे.
Mumbai News : ‘इंडिया’ आघाडीची बैठक मुंबईत होत आहे. बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांच्यासह पाच राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने मुंबईत देशातील अनेक ज्येष्ठ नेते येणार आहेत.
पाटणा, बंगळुरूनंतर आता मुंबईत इंडिया आघाडीची बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला ग्रँड हयात येथे होणार आहे. बैठकीला दिल्ली, बिहार, तामिळनाडू, बिहार, झारखंडचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. बैठकीनंतर ता. १ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद होणार आहे,
यानिमित्ताने आज मुंबईत महाविकास आघाडीची बैठक झाली. बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सुभाष देसाई आदी नेते उपस्थित होते.