चेन्नई, 1 मे : 4 नोव्हेंबर 2008 रोजी संसदेच्या अधिनियमाद्वारे केंद्रीय विद्यापीठ म्हणून इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटी अस्तित्वात आली. सागरी विज्ञान, सागरी इतिहास, सागरी कायदे, सागरी सुरक्षा, शोध आणि बचाव, धोकादायक मालाची वाहतूक, पर्यावरण अभ्यास आणि इतर संबंधित क्षेत्रांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी या शैक्षणिक संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. सागरी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी ही युनिव्हर्सिटी कुशल मनुष्यबळ निर्माण करते. या कामासाठी युनिव्हर्सिटीमध्ये तज्ज्ञ शिक्षकांची गरज भासते.
सध्या इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटीमध्ये असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर पदाच्या जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी युनिव्हर्सिटीनं इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार www.imu.edu.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज भरण्याची शेवटची मुदत 4 मे आहे आणि अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्याची शेवटची तारीख 9 मे आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
रिक्त जागांचा तपशील: इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटीची ही भरती मोहीम 26 रिक्त पदं भरण्यासाठी आयोजित केली जात आहे. त्यापैकी 14 रिक्त जागा असोसिएट प्रोफेसर पदाच्या आहेत आणि 12 रिक्त जागा असिस्टंट प्रोफेसर पदाच्या आहेत.
अॅप्लिकेशन फी : एससी/एसटी उमेदवारांसाठी अर्जाची फी 700 रुपये आहे. इतर प्रवर्गातील सर्व अर्जदारांसाठी अर्जाची फी 1000 रुपये आहे.
अर्ज कसा करावा?
इच्छुक उमेदवार www.imu.edu.in या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवारांना अर्जाची हार्ड कॉपी, ‘रजिस्ट्रार, इंडियन मेरीटाईम युनिव्हर्सिटी, सेमेनचेरी, शोलिंगनलूर पोस्ट, चेन्नई – 600119,’ या पत्त्यावर सबमिट करावी लागेल. निवडलेल्या उमेदवारांच्या मुलाखती अंदाजे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होतील.
प्राचीन काळापासून भारत एक ‘सागरी राष्ट्र’ आहे आणि त्याला समृद्ध सागरी वारसा आहे. हडप्पा संस्कृतीच्या काळापासून भारताचे जगातील इतर राष्ट्रांशी असलेले व्यापारी संबंध याचा पुरावा आहेत. त्यामुळे भारतीयांना सागरी प्रवास आणि सागरी व्यापाराची कला फार पूर्वीपासून अवगत आहे. बदलत्या काळानुसार त्यामध्ये बदल आणि आधुनिकता आणण्यासाठी, त्यासंबंधित कायदेशीर प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी योग्य शिक्षणाची गरज आहे. हीच गरज पूर्ण करण्याचं काम इंडियन मेरीटाईम युनिव्हर्सिटी करते. चेन्नई, कोची, कोलकत्ता, मुंबई पोर्ट, नवी मुंबई आणि विशाखापट्टणम या ठिकाणी युनिव्हर्सिटीचे कॅम्पस आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.